हालचाल करू न शकणार्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पॉंजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
वनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.
वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.
en:Wikipedia:Plant या पानावरून भाषांतरित
वनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणार्या झाडांसाठीच मुख्यतः वापरला जात असे.
ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणार्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.
अथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.
मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसार व सुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.
पाराशर , वृक्षायुर्वेद चा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). व नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.
गोड बटाटा,(इपोमोइया बटाटाज) मौइ नुई बोटॅनिकल गार्डन येथे.
भारताच्या मध्ययुगीन काळातही, उदयन, धर्मोत्तर, गुणरत्न व शंकरमिश्र इत्यादी आचार्यांनी वनस्पतिशास्त्रात भर घातली आहे. विकिपीडिया:वनस्पती/यादी