dcsimg

पापलेट ( المهاراتية )

المقدمة من wikipedia emerging languages
 src=
पापलेट

पापलेट या प्रकारचा मासा भारतआशिया खंडातील लोक खातात. पापलेटला इंग्रजी मधे पॉमफ्रेट Pomfret असे म्हणतात. खाऱ्या पाण्यातील हा मासा हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागरात आढळतो.

माहिती

पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.मासळीच्या बाजारात पॉंफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पॉंफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पॉंफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पॉंफ्रेट, पांढरा पॉंफ्रेट आणि काळा पॉंफ्रेट. करडा आणि पांढरा पॉंफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पॉंफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा कॉंड्रोप्लायटीस वंशातला आहे. काळा पॉंफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुलातला असूनफोर्मिओ वंशाचा आहे. करड्या अथवा रुपेरी पॉंफ्रेटाचे शास्त्रीय नाव स्ट्रोमॅटियस अर्जेंटियस, पांढर्‍याचे कॉंड्रोप्लायटीस चायनेन्सिस आणि काळ्याचे फोर्मिओ नायजर आहे. व्यापारी दृष्टीने फोर्मिओ नायजर या माशाला जरी पॉंफ्रेट म्हणत असले, तरी तो खरा पॉंफ्रेट नव्हे.

प्रकार

संदर्भ

[१]

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92a93e92a93294791f
ترخيص
cc-by-sa-3.0
حقوق النشر
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
النص الأصلي
زيارة المصدر
موقع الشريك
wikipedia emerging languages

पापलेट: Brief Summary ( المهاراتية )

المقدمة من wikipedia emerging languages
 src= पापलेट

पापलेट या प्रकारचा मासा भारतआशिया खंडातील लोक खातात. पापलेटला इंग्रजी मधे पॉमफ्रेट Pomfret असे म्हणतात. खाऱ्या पाण्यातील हा मासा हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागरात आढळतो.

ترخيص
cc-by-sa-3.0
حقوق النشر
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
النص الأصلي
زيارة المصدر
موقع الشريك
wikipedia emerging languages