dcsimg

कोथिंबीर ( marathi )

fourni par wikipedia emerging languages
 src=
कोथिंबिरीच्या झाडाचे अवयव व फळे

कोथिंबीर (इंग्रजी नाव Coriander, हिंदी नाव: धनिया), शास्त्रीय नाव: कोरिॲंड्रम सॅटिव्हम. कोथिंबीर अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ, मिसळ अथवा पोहे यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. फोडणी करताना उकळत्या तेलात कोथिंबीर टाकतात. क्वचित कोथिंबिरीची शिजवून भाजीही केली जाते. कोथिंबिरीच्या वड्या करताना कोथिंबीर वाफवून घ्यावी लागते.

विदर्भात कोथिंबिरीला सांबार असे म्हणतात. (गुजराथमध्ये जेवताना पानात चिरून वाढलेल्या कांदा, किसलेले गाजर वा हिरवी पपई आदींना सांबारो म्हणतात. दक्षिणी भारतातल्या आमटीला सांबार म्हणतात.)

thumbकोथिंबिरीचे झुडुप

वनस्पती

  • ही वनस्पती वर्षायू (जीवनकाल - एक वर्ष) असते.
  • पाने दोन प्रकारची असतात. खालची पाने लांब देठाची, विषमदली व अपूर्ण पिच्छाकृती (पिसासारखी) असून त्यांचे तळ खोडाला वेढणारे असते, तर वरची पाने आखूड देठाची, अपूर्ण पिच्छाकृती व खंडित असतात. खोड पोकळ असते.
  • फुले लहान, पांढरी किंवा गुलाबी-जांभळी असून संयुक्त चामरकल्प (छत्रीसारख्या) फुलोऱ्यात येतात.
  • फळे पिवळट, गोलाकार व शिरा असलेली असून ती दोन सारख्या भागांत विभागतात. प्रत्येक भागात एकेक बी असते. फळाला धणा म्हणतात.

उपयोग

  • कोथिंबिरीची पाने चवीला किंचित तिखट व स्तंभक असून उचकी, दाह, कावीळ इत्यादींवर गुणकारी असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो.
  • फळे मूत्रल, वायुनाशी, उत्तेजक, पौष्टिक व दीपक (भूक वाढवणारे) आहेत. शूल(पोटातील वेदना) व रक्ती मुळव्याध यांवर धण्यांचा काढा देतात.
  • अधिहर्षतेमुळे (अ‍ॅलर्जीमुळे) होणाऱ्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो.
  • या वनस्पतीमध्ये असलेल्या सुगंधी उडनशील तेलांमुळे, या वनस्पतीला सुगंध असतो. हिची वाळलेली फळे म्हणजे धणे मसाल्यांत वापरतात. घटक - यात लोहाचे प्रमाण जास्त असते.
  • कोथिंबीर पचनासाठी चांगली असते.कोथिंबीर रोज आहारात असल्यामुळे मधुमेहाचे प्रमाणात कमी होते.
  • तसेच कर्करोगापासून देखील बचाव होतो.
  • कोथिंबीरीमध्ये फायबर,लोह,मॅगनीज असतात जे कि शरीराला अत्यंत आवश्यक असतात.
  • कोथिंबीरच्या बिया(धने)मासिक पाळीसाठी अत्यंत उपयोगी असतात.
  • कोथिंबीरीचा उपयोग खाद्यपदार्थ सजावटीसाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे खाद्यपदार्थाला सौंदर्य तसेच सुगंध प्राप्त होतो व खाद्यपदार्थ जास्त आकर्षक दिसतो

संदर्भ

[१]

  1. ^ https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/health-news/coriander-has-multiple-health-benefits/articleshow/30452697.cms
licence
cc-by-sa-3.0
droit d’auteur
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

कोथिंबीर: Brief Summary ( marathi )

fourni par wikipedia emerging languages
 src= कोथिंबिरीच्या झाडाचे अवयव व फळे