धुतर ससाणा हा एक शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये धूती शिक्रा, अंधारी बाज (स्त्री.), धूती शिखरा (पु.) असेही म्हणतात. इंग्रजीत याला Eurasian Hobby म्हणतात. हिंदी त्याला कश्मिरी मोरास्सानी, धूती, धूतारा, मोरास्सानी असे म्हणतात. गुजरातमध्ये धोती (स्त्री.), धुतार (पु.) असे म्हणून ओळखले जाते.
आकाराने कबुतरा एवढा. दिसायला बहिरी ससाण्यासारखा; पण आकाराने लहान शेपटीसहित वरील अंगावर पट्टे नसतात. अरुंद मिशा. मानेवरच्या बाजूला पांढरा चट्टा असतो. खालील भागावर रेषा असतात. पोटाखालचा भाग काळसर लाल असतो. उडताना लांब आणि रुंद पंखांचा व लहान शेपटीचा वाटतो.
हिवाळी पाहुणे असतात. पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश आणि भारतात दक्षिणेकडे बेळगावपर्यंत.
माळराने आणि विरळ झाडे असलेला प्रदेश.