मराठी नाव : शेकाटया, पाणटिलवा, टिलवा.
इंग्रजी नाव : Blackwinged Stilt (ब्लॅकविंग्ड स्टिल्ट)
शास्रीय नाव : Himantopus himantopus( हिमॅंटोपस हिमॅंटोपस )
आकार : २५ सेंमी
माहिती : उथळ पाण्यात वावरणारा हा एक काळा-पांढरा पक्षी असून त्याच्या लाल रंगाच्या आणि काड्यांसारख्या लांबलचक पायांवरून ओळखू येतो. नदीवर, तलावांच्या काठांवर शेकाटे दिसायला लागले, की पक्ष्यांचं स्थलांथर सुरु झाल्याची चाहूल लागते. पक्षीनिरीक्षक सावध होतात आणि इतर स्थलांतरी पक्ष्यांचा शोध सुरु होतो. दलदली, पाणथळ जागा, गावतळी, नद्या, मिठागरे आणि खाड्यांवर हे 'लंबूटांग' दिसतात.
निमुळत्या काळ्या चोचीच्या उपयोग करून शेकाटयांना गोगलगायी, कालव यांच्यासारखे कठीण कवचाचे जलचर, अळया आणि पाणकीटक पकडता येतात. हे पक्षी लहान-मोठ्या थव्यांमध्ये दिसतात आणि रात्रीच्या वेळी स्थलांतर करतात. रात्रीच्या अंधारात हे पक्षी एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यामुळे थव्यातला प्रत्येक पक्षी पिपाणीसारखा आवाज काढून आपापली जागा कुठे आहे हे दुसरया पक्ष्याला सांगतो. काही शहरांमध्ये गटाराच मैलोपाणी नदीत ज्या ठिकाणी सोडलं जातं अशा जागा शेकाटे विशेष पसंत करतात. सुमारे ५० ते १०० पक्ष्यांचे थवे गोळा होतात. कारण अशा ठिकाणी त्यांना त्याचं खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होत. उथळ पाण्यात चालत जाणारा शेकाटया गरज वाटली तर पोहू शकतो.