dcsimg

मोठी लालसरी ( 馬拉提語 )

由wikipedia emerging languages提供

मोठी लालसरी किंवा शेन्द्र्या बाड्डा या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये त्यास Redcrested Pochard असे म्हणतात.तर मात्राठी मध्ये चिकल्या,गोंदियामधील भंडारा जिल्ह्यात या पक्ष्यास शेन्द्र्या,शेंदूर बाड्डा,आणि ठाण्यामध्ये यास भवर असे म्हणतात तर हिंदी भाषेमध्ये त्यास डूम्मर,लालसर,लालसिर,गुजरातीमध्ये रातोबरी,लाल चांच आणि संस्कृतमध्ये यास रक्तचूड,मज्जिका,रक्तशीर्षक असे म्हणतात. या पक्ष्याचे नर व मादी हे दोन प्रकार आहेत यापैकी नराच्या डोक्यावर मखमली शेंदऱ्या रंगाची लव असते.चोच हि लाल रंगाची असते आणि वरील रंग फिक्कट उदी रंगाचा असतो त्यांच्या खांद्यावर पांढरे डाग असतात.पंखावर पांढरा ऐना असतो.त्याचा खालील रंग हा कला असतो व पांढऱ्या बरगड्या असतात.उडताना त्याचे डोक व चोच हि शेंदरी दिसते.त्याचे अंग हे काळ्या रंगाचे असते व पांढऱ्या रंगाच्या पाखी,पंखांखालचा भाग हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा व पंखाच्या टोकावरची शुभ्र पट्टी हे त्याचे वैशिष्ट आहे. मादीचा वरच्या भागाचा रंग हा फिक्कट असतो ,धूसर उदी असतो.तिचा खालील रंग हा पंढूरका असतो व माथा हा गडद उदी असतो.चेहरा हा गौर असतो गाळ्यापासून मानेचा रंग हा आखीव असतो.व पंखावर पांढरी पट्टी असते नरापासून वेगळ्या असलेल्या मादीला ओळखायला अभ्यास व सराव लागतो. प्रामुख्याने हा पक्षी हिवाळ्यात भारतात व पाकीस्तानमध्ये हिवाळी पाहुणा असतो तर पूर्वेकडे आसाम आणि दक्षिणेत तमिळनाडूत त्यांचे प्रमाण कमी-कमी होत जाते व कर्नाटककेरळ या ठिकाणी कधी आढळून येत नाहीत. हा पक्षी फ्रान्स आणि राशीमध्ये वीण असतो. या पक्ष्याची मुख्य राहण्याची ठिकाणे म्हणजे सरोवरे आणि झिलाणी हि आहेत

संदर्भ

पुस्तकाचे नव:-पक्षिकोश

लेखकाचे नव:-मारुती चितमपल्ली

許可
cc-by-sa-3.0
版權
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
原始內容
參訪來源
合作夥伴網站
wikipedia emerging languages

मोठी लालसरी: Brief Summary ( 馬拉提語 )