dcsimg

कैकर ( Marathi )

wikipedia emerging languages tarafından sağlandı
 src=
मीनखाई घार
 src=
मीनखाई घार
 src=
Pandion haliaetus

कैकर हा एक शिकारी पक्षी आहे. या पक्षाला मराठीमध्ये मच्छीमार, मीनखाई घार, मोरघार ईजना, मासेमारी घार, कनेरी, काकणघार, कांतर, मांसी, लंगड्या असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Western osprey म्हणतात. हिंदीमध्ये मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार म्हणतात. संस्कृतमध्ये कुरर, कुरल, पंकजित, मत्सकुरर, मत्स्यनाशन कुरर, सारस म्हणतात. गुजरातीमध्ये मच्छीमार, माछीमार म्हणतात. तेलगुमध्ये कोरमि गद्द म्हणतात.

ओळख

आकाराने अंदाजे घारीएवढा. गडद उदी रंगाचा पक्षी. डोके उदी पांढरे. शरीराचा खालचा भाग पांढरा. छातीवर रुंद उदी कंठा. त्यावरून ओळख पटते. नर-मादी दिसायला सारखे.

वितरण

नेपाळच्या खोऱ्यात वर्षभर आढळून येतात. भारत, श्रीलंका, लक्षद्वीप, मालद्वीप आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे. लडाख, काश्मीर, गढवाल, कुमावून आणि आसाम या भागात मार्च-एप्रिल या काळात वीण.

निवासस्थाने

सरोवरे, जलाशय आणि खाडी.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
lisans
cc-by-sa-3.0
telif hakkı
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

कैकर: Brief Summary ( Marathi )

wikipedia emerging languages tarafından sağlandı
 src= मीनखाई घार  src= मीनखाई घार  src= Pandion haliaetus