dcsimg

पिंगट गरुड ( маратски )

добавил wikipedia emerging languages
 src=
Aquila rapax

सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो.[२] तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.[३]

वर्णन

सुपर्ण हा आकारमानाने घारीपेक्षा मोठा व नेपाळी गरुडापेक्षा छोटा असतो. त्याची लांबी ६० ते ७५ सेमी पर्यंत असते. त्याचा रंग गडद उडी ते मातकट बदामी असतो. पाय पिसांनी झाकलेले असतात.

तो अपमार्जक व परभक्षक दोन्ही आहे. ससाणे, घारी व छोट्या शिकारी पक्ष्यांकडे भक्ष्य पाहून उत्तेजित होतो व ते भक्ष्य पळवतो. गिधाडांबरोबर मृत जनावरे देखील खातो परंतु अलीकडील काळात हे दृश्य दुर्मीळ झाले आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल (२०१६). "ॲक्विला रॅपॅक्स". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर. २३-०४-२०१७ रोजी पाहिले.
  2. ^ चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश.
  3. ^ बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण ॲन्ड मलबार - सतीश पांडे
лиценца
cc-by-sa-3.0
авторски права
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
изворно
посети извор
соработничко мреж. место
wikipedia emerging languages

पिंगट गरुड: Brief Summary ( маратски )

добавил wikipedia emerging languages
 src= Aquila rapax

सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो. तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.

лиценца
cc-by-sa-3.0
авторски права
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
изворно
посети извор
соработничко мреж. место
wikipedia emerging languages