dcsimg

सस्तन प्राणी ( Marathi )

fornecido por wikipedia emerging languages
 src=
सस्तन प्राणी

ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.

उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.

हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.

उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ

प्रकार

सस्तन प्राण्यांची श्रेणीनुसार यादी

  1. कीटाद (Insectivora) हे किडे खाणारे पशू आहेत. यांना पाच बोटे असतात आणि तोंड लांबट असते. उदा. चिचुंदरी
  2. निपतत्री (Dermoptera) यांना पंख असतात, त्यात सांगाडा नसतो, पंख केवळ खाली उतरण्याच्या उपयोगी पडतात. उदा. पंखवाले लेमूर
  3. उत्पतत्री (Chiroptera) यांना पंख असतात, त्यात हाडाचा सांगाडा असतो, ते वर उडण्याच्या उपयोगी पडतात पण यांना पिसे नसतात. उदा. वटवाघुळे
  4. प्रकृष्ट (Primates) यांचा मेंदू प्रकर्ष पावलेला असतो. यांना मूठ आणि चिमूट वळता येते. यातील प्राण्यांना पशूत्तम आणि जीवोत्तम असेही म्हणतात. उदा. माणूस
  5. अदंत (Edentata) यांना दात नसतात किंवा असले तरी ते कुरतडण्याच्या कामी येत नाहीत. उदा. पॅंगोलिन
  6. कृंतक (Rodentia) यांचे दात कुरतडण्याच्या कामी उपयोगी असतात. उदा. उंदीर
  7. मांसाहारी (Carnivora) यांना मांस खाण्यासाठी सुळे व दाढा असतात. उदा. मांजर
  8. तिमी (Cetacea) शाकाहारी, जलचर पशू, यांना तुरळक केस असतात. उदा. देवमासा
  9. रिमी (Sirenia) हे सुद्धा शाकाहारी जलचर पशू आहेत, यांना केस नसतात.
  10. सीलार (Pinnipedea) सील आणि वल्लर प्राणी या श्रेणीत आहेत.
  11. शुंडावंत (Proboscidea) या प्राण्यांना सोंड असते. उदा. हत्ती
  12. अयुग्मखुरी (Perissodactyla) यांच्या पायांना विषमसंख्य खूर असतात. उदा. घोडा
  13. युग्मखुरी (Artiodactyla) यांच्या पायांना समसंख्य खूर असतात. उदा. गाय

सस्तन प्राण्यांमध्ये मांसाहारी, कीटाहारी, शाकाहारी, कुरतडणारे (कृंतक) प्राणी असे विविध प्राणी आहेत.

मांसाहारी प्राण्यातील कुळे

कीटाहारी प्राण्यातील कुळे

शाकाहारी प्राण्यातील कुळे

कृंतक प्राण्यातील कुळे

  • शशाद्य (Leporidae) शश (Hare) आणि शशक (Rabbit) असे दोन्ही प्रकारचे ससे शशाद्य कुळातील सदस्य आहेत.
  • मूषकाद्य (Muridae) उंदीर, घूस हे प्राणी मूषकाद्य कुळातील आहेत.
  • कीचघूषाद्य (Rhizomyidae) छोटी आणि मोठी बांबू घूस कीचघूषाद्य कुळातील आहे.
  • शायिकाद्य (Sciuridae) शायिकाद्य कुळात विविध खारी आणि मार्मोत प्राणी आहेत.
  • शशुंदराद्य (Ochotonidae) शशुंदराद्य कुळ शशुंदर (Mousehare) प्राण्यांचे कुळ आहे.
  • शलींदराद्य (Hystricidae) सायाळ प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
  • बीव्हराद्य (Castoridae) बीव्हर प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
  • चिंचिलाद्य (Chinchillidae) चिंचिल्ला प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
  • मंदमूषकाद्य (Muscardinidae) झोपाळू उंदीर (Dormouse) प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
licença
cc-by-sa-3.0
direitos autorais
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
original
visite a fonte
site do parceiro
wikipedia emerging languages

सस्तन प्राणी: Brief Summary ( Marathi )

fornecido por wikipedia emerging languages
 src= सस्तन प्राणी

ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.

उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.

हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.

उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ

licença
cc-by-sa-3.0
direitos autorais
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
original
visite a fonte
site do parceiro
wikipedia emerging languages