जांभळा बगळा हा एक पाणथळ जागी राहणारा पक्षी आहे. त्याची वीण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप आणि दक्षिण तसेच पूर्व आशियात होते.
जांभळया बगळ्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘ Purple Heron’ असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला मोठा ढोक म्हणतात (नक्की?). तर हिंदीमध्ये त्यास अंजन, नरी, निरगोंग, लाल अंजन, लाल सैन म्हणतात. अन्य भाषांतील शब्द :-
जांभळा बगळा हा राखी बगळ्यापेक्षा लहान आणि सडपातळ असतो. त्यांतील नर व मादी सारखेच दिसतात. त्यांचे रंग, रूप, आकार, इत्यादी सारखेच असते. त्या दोघांचा रंग जांभळा, निळा अथवा जांभळसर काळा असतो. त्यांचे पंख व शेपटी काळसर रंगाची असते. शरीराचा मधला भागाचा व तुऱ्याचा रंग राखी काळा असतो. त्यांच्या तांबूस मानेवर काळ्या रेघा असतात; हनुवटी व कंठ हे पांढऱ्या रंगाचे असतात. जांभळ्या बगळ्याच्या छातीवरच्या बदामी कलाबुती पिसांवर तांबूस काड्या असतात व इतर भाग हा पांढऱ्या वर्णाचा असतो.
हा पक्षी साधारणतः भारतातील पाणथळ प्रदेशात, श्रीलंका,अंदमान आणि निकोबार बेटे, इत्यादी भागांत आढळतो .तो देशातल्या देशात स्थलांतर करणारा पक्षी आहे. उत्तर भारतात तो जून ते ऑक्टोबर, तसेच दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये नोव्हेंबर ते मार्च या काळांत दिसतो.
तो बहुतकरून दलदली, सरोवरे, खाजणी आणि भातखाचरे असलेल्या भागांत निवास करतो. ही सगळी ठिकाणे त्याची निवासस्थाने म्हणून ओळखली जातात.
पुस्तकाचे नाव : पक्षिकोश
लेखकाचे नाव : मारुती चितमपल्ली
जांभळा बगळा हा एक पाणथळ जागी राहणारा पक्षी आहे. त्याची वीण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप आणि दक्षिण तसेच पूर्व आशियात होते.
जांभळया बगळ्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘ Purple Heron’ असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला मोठा ढोक म्हणतात (नक्की?). तर हिंदीमध्ये त्यास अंजन, नरी, निरगोंग, लाल अंजन, लाल सैन म्हणतात. अन्य भाषांतील शब्द :-
संस्कृत - नीलांग, नलारुण बक, पूर्वीय नीलारुण बक गुजराथी - नडी तेलगू - येर्र नारायण पक्षी, पमुल नारीगाडू तमिळम - चिन्नारै