अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वल प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात, चष्मेवालं अस्वल मात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मुस्टेलॉइड(यामध्ये पंडाद्य, मिंकाद्य व राकूनाद्य कुळांचा समावेश होतो) व पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते.[१]।
पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किव्हा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखिल काळ्या रंगाची, फक्त त्याचा केसांचा रंग पांढरा असतो[२].
पांडाचे गुणधर्म अस्वले व रकून य दोघांशी मीळतेजुळते असल्यामुळे, त्याला अस्वलांच्या कुळात समाविष्ट कर्ण्यामधे वादविवाद् होते। परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरुन शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले। त्यामुळे आता अस्वलांच्या एकूण ८ प्रजाती आहेत।
अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात.
ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा, किंवा हवेतील वास हुंगण्यासाठी ते बहुधा मागील पायांवर उभे राहिलेले दिसतात.[३]त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.भारतातील तपकिरी अस्वल(ब्राऊन बेअर) हे जवळजवळ १ ते दीड किलोमीटरवरून येणारा वास हुंगू शकते[४].
अस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते बव्हंशी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो(सील,वॉलरस इत्यादी), तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल(स्लॉथ बेअर) हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खाते. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकते[५].
अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वल प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात, चष्मेवालं अस्वल मात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मुस्टेलॉइड(यामध्ये पंडाद्य, मिंकाद्य व राकूनाद्य कुळांचा समावेश होतो) व पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते.।
पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किव्हा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखिल काळ्या रंगाची, फक्त त्याचा केसांचा रंग पांढरा असतो.