बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. याचे फार मोठे वृक्ष होत नाहीत आणि या झाडांना काटे असतात. याच्या बीस 'आटोळी' म्हणतात.महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ विभागत बोरिंची काटेरी झुडपे आढळतात.
उमराण, चण्यामण्या बोर, चमेली, चेकनेट, बकुळा बोर, बनारसी बोर, बाणेरी बोर
चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.
चांगली फळे नळाच्या पाण्याने धुवून त्यांवरची माती, कचरा इ. काढले जातात. प्रत्येक बोराचे देठ हाताने काढले जाते. स्टेनलेस स्टीलच्या अत्यंत धारदार सुरीने बोराची साल काढतात. ह्या सर्व प्रक्रियेदरम्यान, खराबी किंवा संसर्ग टाळण्यासाठी, कमालीची स्वच्छता राखली जाते. ह्यानंतर फळाच्या गराच्या फोडी केल्या जातात व बिया काढून टाकतात. कॅंडीला फिका व एकसारखा रंग येण्यासाठी ह्या फोडींवर ०.२ % केएमएसने ब्लांचिंगची प्रक्रिया करतात. ऑस्मॉटिक एजंट (कारक) म्हणून साखरपाणी (३०, ४०, ५० and ६० °B) वापरतात. ह्याला १०० °C पर्यंत उकळवून व त्यात ०.२ % सायट्रिक ऍसिड टाकून साखरेचा पाक करतात. हा पाक नंतर वस्त्रगाळ करून वातावरणीय तापमानापर्यंत थंड करतात. प्रत्यक्ष बोराची कॅंडी बनवण्यासाठी एका भांड्यात बोरांच्या फोडी व साखरेचा पाक १:२ (फोडीःपाक) ह्या प्रमाणात घेऊन 48 तासांपर्यंत मुरवतात. ह्यानंतर पाक काढून टाकतात व बोराच्या फोडी ट्रेमध्ये नीट ठेवून, ट्रे ड्रायरच्या सहाय्याने, ६०°C तापमानावर ५-६ तास सुकवल्या जातात. थंड झाल्यानंतर हे तुकडे पॅक करतात.
बोराच्या कॅंडीचे पोषणात्मक प्रमाण – आर्द्रता, TSS, ऍस्कॉर्बिक ऍसिड, आम्लता (ऍसिडिटी), एकूण साखर व रिड्यूसिंग साखर ह्या घटकांच्या संदर्भात - अनुक्रमे असे आहे - १०.०८ %, ४८ °B, ९५.९७ मिग्रॅ/१०० ग्रॅम, ०.२२५ %, २१.६५ % व ९.६७ %.
बोराच्या ह्या गोळ्यांचे पोषणात्मक मूल्य चांगले असते आणि मुलांनी (मोठ्यांनीसुद्धा) कृत्रिम रंग व चवी घालून बनवलेल्या इतर गोळ्यांपेक्षा बोराची कॅंडी खाणे नक्कीच हिताचे आहे.
http://www.esakal.com/esakal/20091120/5315157015492244342.htm
बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. याचे फार मोठे वृक्ष होत नाहीत आणि या झाडांना काटे असतात. याच्या बीस 'आटोळी' म्हणतात.महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ विभागत बोरिंची काटेरी झुडपे आढळतात.