मातकट पायाची फटाकडी' किंवा चित्रित फटाकडी किंवा चित्राळ फटाकडी (इंग्लिश:indian banded crake, statylegged banded crake; हिंदी: पट्टीवाली मुर्गी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा लहान असतो व पंखाखाली पांढरे पट्टे असतात. पंख मिटले कि हे पट्टे दिसत नाही. त्याचे पाय हिरवे-उदी, उदी किंवा काळे असतात. माथा आणि मानेमागचा रंग काळा-तांबूस असतो आणि पोटाखाली काळे आणि पांढरे पट्टे असतात.
हे पक्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका तसेच फिलिपिन्स तसेच इंडोनेशियापर्यंत आढळतात. ते पठारी प्रदेश, तसेच १,६०० मीटर उंचीपर्यंत सर्व भारतात आढळतात. महाराष्ट्रात खंडाळा येथे दिसतात.
दाट जंगले आणि पाणी असलेली दाट झुडपे अश्या ठिकाणी निवास करतात.
मातकट पायाची फटाकडी' किंवा चित्रित फटाकडी किंवा चित्राळ फटाकडी (इंग्लिश:indian banded crake, statylegged banded crake; हिंदी: पट्टीवाली मुर्गी) हा एक पक्षी आहे.