भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्ट्रामध भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते. भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली ८१९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.[१]
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीक टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावे.भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.[२]
भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्ट्रामध भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते. भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली ८१९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.