dcsimg

कोळी ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
कोळी
order of arachnids
Orb weaver spider day web02.jpg
Aranya a la seva teranyina
Spiders Diversity.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikispecies-logo.svg Wikispeciesप्रकार टॅक्सॉन आरंभ वेळ 320 millennium BC Taxonomyसाम्राज्यAnimaliaSubkingdomBilateriaInfrakingdomProtostomiaSuperphylumEcdysozoaPhylumArthropodaSubphylumChelicerataClassArachnidaOrderAraneaeTaxon author Carl Alexander Clerck, इ.स. १७५७ Edit this on Wikidata अधिकार नियंत्रण Blue pencil.svg

Spider main organs labelled.png कोळी हा आठ पायांचा कीटकवर्गातील प्राणी आहे. यास अष्टपदी जीव असेही म्हंटले जाते. घरातले कोळी हे सर्वसाधारणपणे कीटक खाऊन आपले घर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात.

 src=
कोळी

प्रकार

कोळ्यांचे विविध प्रकार आहेत. कोळ्यांची वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते. तंबूसारखे जाळे विणणारा कोळी (Tent Spider), नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी (Funnel Web spiden), जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा कोळी (Giant Wood Spider), आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी (Signature Spider) असे विविध प्रकारचे कोळी आढळतात.

सर्वच कोळी जाळे विणत नाहीत

काही कोळी न चालता उड्या मारतात म्हणून त्यांना उड्या मारणारे कोळी (Zebra Jumper) म्हणतात. तसेच जाळे न विणणारे काही कोळी शिकारी असल्याने त्यांना लांडगा कोळी (Wolf spider) म्हंटले जाते. जाळे नसल्याने शिकारी कोळ्याची मादी आपली अंडी आपल्याच पाठीवर वाहत असते.

 src=
अराना जातीचा कोळी

जीवन

कोळी बरेच दिवस अन्न-पाण्याव्यतिरिक्त राहू शकतात. अन्न पचवण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे, ज्यात कोळी आपले पाचक रस आपल्या भक्ष्यात सोडतात आणि मग विघटित झालेले द्रव रूपातील अन्न शोषून घेतात. कोळ्यांना चार ते आठ डोळे असतात. बरेच कोळी आपल्या जवळच्या गोष्टीच पाहू शकतात, पण त्यांच्या अंगावरील संवेदनशील केस त्यांना सतर्क राहण्यास मदत करतात.[१]

 src=
कोळ्याचे जाळे
 src=
विषारी लॅट्रोडेक्टस कोळी

विषारी कोळी

सर्व केसाळ कोळी विषारी नसतात. मात्र त्यातला टॅरेंटुला (Tarantula) हा कोळी जगभरात प्रसिद्ध आहे. याचा आकार जवळजवळ आपल्या पंजा इतका मोठा असतो. कोळ्यामध्ये मादी ही नराहून मोठी असते.

जगाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळे कोळी सापडतात. ऑस्ट्रेलियात सापडणारे पाठीवर लाल ठिपका अथवा पांढरा पट्टा असलेले कोळी विषारी असतात. त्यांच्या चावण्याने मानवी शरीराची चावलेली जागा लाल होते व आग होते. अशावेळी त्वरेने वैद्यकीय उपचार घ्यावेत. मात्र हे चावणे जीवघेणे नसते. काही कोळी मात्र अतिशय विषारी असू शकतात. उदा० चित्रात दिसत असलेला पाठीवर लाल खूण असलेला लॅट्रोडेक्टस कोळी.

संदर्भ

  1. ^ "मुख्य — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. 2019-03-04 रोजी पाहिले.
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

कोळी: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

Spider main organs labelled.png कोळी हा आठ पायांचा कीटकवर्गातील प्राणी आहे. यास अष्टपदी जीव असेही म्हंटले जाते. घरातले कोळी हे सर्वसाधारणपणे कीटक खाऊन आपले घर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात.

 src= कोळी
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक